कोरोना रुग्णसंख्येत झाली घट; जंम्बो कोविड सेंटर लवकरच बंद करणार

योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे चौथी लाट वेळीच रोखण्यात पालिकेला यश आले
कोरोना रुग्णसंख्येत झाली घट; जंम्बो कोविड सेंटर लवकरच बंद करणार

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांसह जंम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल होणाऱ्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे उर्वरित ७ जंम्बो कोविड सेंटर लवकरच बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा कानपूर आयआयटीने दिला आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेचा फैलाव होईल, असे आयआयटीने अहवालात स्पष्ट केले आहे. मात्र योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे चौथी लाट वेळीच रोखण्यात पालिकेला यश आले. त्यामुळे रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने घट झाली असून रोज आढळणारी रुग्ण संख्या २०० ते ३०० च्या आत आली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांचीही संख्या केवळ २ ते ५ टक्क्यांपर्यंत आहे. तर अ‍ॅक्टिव असलेल्या सात जंम्बो कोविड सेंटरमधील सुमारे १५ हजार बेडवर १ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे लवकरच जम्बो कोविड सेंटर बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in