एम इंडिकेटर युजर्सची संख्या दीड कोटी पार

प्रतिदिन ६० हजारहून अधिक प्रवाशांकडून लाईव्ह लोकेशन शेअर
एम इंडिकेटर युजर्सची संख्या दीड कोटी पार

कोरोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदी काळात रेल्वेसेवा बंद असल्याने प्रवाशांच्या अंगवळणी पडलेले एम इंडिकेटर अँप वापरकर्त्यांची संख्या कमालीची घटली. हळूहळू कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले. पुन्हा रेल्वे प्रवासी संख्या वाढत असताना रेल्वे प्रवासादरम्यान इच्छित स्थळ गाठण्यासाठी तसेच प्रवासात कुठे आहोत? ट्रेन कुठे आहे? याबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांकडून पुन्हा एम इंडिकेटरचा वापर वाढू लागला. मागील ३ वर्षात ७० लाख ते ८० लाख एवढी घटलेली वापरकर्त्यांची संख्या आता सद्यस्थितीत दीड कोटींच्या घरात गेली असल्याचे एम इंडिकेटरचे सर्वेसर्वा सचिन टेके यांनी सांगितले.

एका क्लिकवर रेल्वेस्थानक, रेल्वेचे लाईव्ह लोकेशनची माहिती देणारे आणि अल्पावधीतच प्रवाशांच्या अंगवळणी पडलेल्या एम इंडिकेटर ॲप २०१० मध्ये सुरु करण्यात आले. अँपचे महत्त्व आणि योग्य वापर समजल्यानंतर मागील १२ वर्षात हे अँप वापरणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली. परंतु २०२० आणि २०२१ मध्ये आलेल्या कोरोना लाटेने या अँप आणि प्रवासी यांच्यामध्ये दरी निर्माण केली. तब्बल एक कोटी प्रवासी या ॲपचा वापर करत असताना ही संख्या त्या वर्षात ८० लाख म्हणजेच जवळपास २० ते २५ टक्क्यांनी घसरली. परंतु जनजीवन पुन्हा सुरळीत झाल्यानंतर एम इंडिकेटर या अँपमध्ये आवश्यक ते बदल व्यवस्थापनाकडून करण्यात आले. सध्या रेल्वे, बसेस, रिक्षा-टॅक्सी या सर्व दळणवळणाच्या साधनांमध्ये प्रवासी संख्या वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांकडून एम इंडिकेटर अँपचा वापर देखील वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर अल्प कालावधीतच या अँपचा तब्बल दीड कोटीहून अधिक प्रवाशांनी वापर केला असल्याचे अँपचे प्रमुख टेके यांनी सांगितले.

प्रतिदिन ६० हजारहून अधिक प्रवाशांकडून लाईव्ह लोकेशन शेअर

प्रवाशांकडून रेल्वेमध्ये बसल्यानंतर करंट लोकेशन शेअर होण्याचे प्रमाण कमी असल्याने अन्य स्थानकांवर वाट पाहत असणाऱ्या प्रवाशांना रेल्वे कुठपर्यंत पोचली आहे याची अचूक माहिती मिळणे कठीण जात होते. ही बाब लक्षात येताच संबंधित व्यवस्थापनाने जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास करताना आपले ''करंट लोकेशन'' त्वरित शेअर करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मागील काही महिन्यांमध्ये लाईव्ह लोकेशन शेअर करणारे आणि ते पाहणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढल्याचे अँपचे प्रमुख सचिन टेके यांनी सांगितले. रेल्वे कुठपर्यंत पोहचली आहे? याबाबत लाईव्ह लोकेशन हे नवीन अपडेट या ॲपमध्ये करण्यात आले. हे नवीन अपडेट प्रवाशांच्या पसंतीस देखील उतरले आहे. सध्या प्रतिदिन ६० हजारांहून अधिक प्रवासी आपले लाईव्ह लोकेशन शेअर करत सुरळीत प्रवास करण्यास एकमेकांना सहकार्य करत असल्याचे टेके यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in