फसवणुकीच्या गुन्ह्यांत टुर्सच्या मालकाला दिड वर्षांनी अटक

या यात्रेसाठी तिने विमान तिकिट काढण्यासाठी राजेश पटेल याच्या पावन टुर्स कंपनीला दिले होते.
फसवणुकीच्या गुन्ह्यांत टुर्सच्या मालकाला दिड वर्षांनी अटक

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका टुर्स मालकाला दिड वर्षांनी कांदिवली पोलिसांनी अटक केली. राजेश रमेशभाई पटेल असे या मालकाचे नाव असून, त्याच्यावर एका शिक्षिकेसह ३५ जणांच्या विमान तिकिटाचा सुमारे साडेतीन लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश पटेल याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जोगेश्‍वरी येथे राहणारी तक्रारदार महिला शिक्षिका असून, तिने तिच्या पतीसह ३५ मित्र आणि नातेवाईकांसोबत चारधाम यात्रेचे नियोजन केले होते. या यात्रेसाठी तिने विमान तिकिट काढण्यासाठी राजेश पटेल याच्या पावन टुर्स कंपनीला दिले होते. या सर्वांचे मुंबई-देहरादून आणि देहरादून असा विमान तिकिटाचा खर्च अकरा लाख रुपये होत होता. त्यामुळे तिने त्याला साडेतीन लाख रुपये आगाऊ दिले होते; मात्र त्याने विमान तिकिटासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून त्यांची फसवणूक केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in