
मुंबई शहरात पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ट्विट मुंबई पोलिसांना प्राप्त झाला असून या ट्विटनंतर स्थानिक पोलिसांनी एका तरुणाला नांदेडहून अटक केली. या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास सुरु आहे. दरम्यान, सतत बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई पोलीस प्रचंड हैरान झाले असून अशा व्यक्तीविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांचे एक अधिकृत ट्विटर हँडल असून या हँडलवर सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने एक मेसेज पाठविला होता. त्यात मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.