आजच्या सामन्यानंतर प्ले ऑफ फेरीचे चित्र स्पष्ट होणार

आजच्या सामन्यानंतर प्ले ऑफ फेरीचे चित्र स्पष्ट होणार

आयपीएल २०२२च्या ६९व्या सामन्यात शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुकाबला होत असून लीगमधील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्स दिल्लीच्या प्ले ऑफ फेरीत रसत्यात काटे टाकणार का, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. या सामन्यानंतर प्ले ऑफ फेरीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफ फेरीत प्रवेश करण्यासाठी सर्वात तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करणे आवश्यक आहे. १४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला १६ गुण असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चौथे स्थान हिसकावून घेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. असे झाले तर नेट रनरेटच्या जोरावर प्ले ऑफ फेरीचे दरवाजे दिल्लीसाठी उघडले जातील.

याआधीच्या सामन्यात दिल्लीने मुंबईला नमविले होते; परंतु मुंबई आता उरलीसुरली प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार असल्याने या संघाचा खेळ उंचावला जाण्याची शक्यता आहे. मुंबईला आता गमावण्यासारखे काहीच उरलेले नसल्याने या सामन्यात संपूर्ण दबाव हा दिल्लीवर असणार आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. या संघाला लय सापडलेली असली, तरी आता खूप उशीर झाला आहे.

परंतु या संघाची कामगिरी मात्र अन्य संघांची गणिते चुकविणारी ठरण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in