चारकोपमध्ये झाला वीजपुरवठा खंडित

 चारकोपमध्ये झाला वीजपुरवठा खंडित
Published on

उकाड्यामुळे आधीच हैराण झालेल्या चारकोपमधील नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. चारकोप येथील आरएससी-३ मधील २१५ ते २३६ सोसायटी व आरएससी-८ मधील २२२ ते २२९ सोसायटी तसेच आरएससी ८ मधील सर्व बंगल्याचा मंगळवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला होता. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शुभदा गुढेकर यांना माहिती मिळताच अदाणी इलेक्िट्रसिटी कार्यालयात संपर्क साधला आणि वीजपुरवठा सुरळीत झाला.

मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून ३०० हून अधिक कामे सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रस्तेकामे सुरू असून, रस्ते खोदताना केबल नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. चारकोप येथील सोसायटी आणि बंगल्यांचा मंगळवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला होता. शुभदा गुढेकर यांच्या अधिपत्याखाली आरएससी ८ मधील संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करत असताना तीन ठिकाणी मोठे शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाला होता. शिवसेना शाखा क्र. १९ चे शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अदाणी इलेक्िट्रसिटी कार्यालयात संपर्क साधला आणि अर्ध्या तासात अदाणी विद्युत पुरवठा करणारे अधिकारी एम. पाटील व रामचंद्र मिस्त्री हे घटनास्थळी पोहोचले. अखेर त्यांनी रात्री ११.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.

logo
marathi.freepressjournal.in