शालेय साहित्याचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले

साहित्यावरील जुन्या किमती लपवून वाढीव किमतीत साहित्याची विक्री करण्यात येत आहे.
शालेय साहित्याचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले

कोरोना काळानंतर वाढलेले कागदाचे दर, शाईचे दर आणि इंधनाचे गगनाला भिडलेल्या दरामुळे शालेय साहित्यात तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनापूर्वीच्या साहित्यावरील जुन्या किमती लपवून वाढीव किमतीत साहित्याची विक्री करण्यात येत आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर गेल्या बुधवारपासून शाळा सुरू झाल्या. मागील दोन वर्षे ऑनलाइन शिक्षणामुळे गणवेश, दप्तर, वह्या यांची खरेदी कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी ऑफलाइन शाळा सुरू झाल्याने बहुतेक पालकांना सर्व सामग्री नव्याने खरेदी करावी लागत आहे. वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, पॅड, पेन, पेन्सिल, चित्रकलेचे साहित्य ते गणवेश या सर्वच वस्तूंच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला यंदा मोठी झळ बसली आहे. कागद, शाईबरोबरच स्टीलचे दर वाढल्याने कंपास साहित्यदेखील २० टक्क्यांनी महागले आहे. शंभर रुपयांना मिळणाऱ्या कंपासपेटीची किंमत १३० ते १५० रुपये झाली आहे. वस्तू आणि सेवा कर वाढल्याने पेन, पेन्सिल यांच्याही किमतीत वाढ झाली आहे. यासह, ३०० ते ४०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या दप्तराची किंमत ५०० ते ७०० रुपये झाली आहे.

पालकांना विशिष्ट कंपन्यांचे साहित्य घेण्यास शाळा भाग पाडतात. अनेक शाळा वह्या आणि इतर शालेय साहित्य शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती करतात. त्यामुळे पालकांची संख्या नेहमीपेक्षा ४० टक्क्यांनी घटली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in