शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावीच लागणार - उद्धव ठाकरे

मंगळवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची त्‍यांनी बैठक घेतली.
शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावीच लागणार - उद्धव ठाकरे

आज एका बाजूला गददारांच्या डोळ्यातील विकृत हसू आहे. तर दुस-या बाजूला माझ्या शिवसैनिक भगिनींच्या डोळ्यातले अश्रू आहेत. यात मी मध्ये उभा आहे. यातून मला मार्ग काढायचा आहे आणि तो मी काढणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला. शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावीच लागणार, असा इशारा देताना ज्‍यांच्यावर विश्वास ठेवला त्‍यांनीच दगा दिल्‍याची खंतही त्‍यांनी व्यक्‍त केली.मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्‍यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसैनिक, पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची त्‍यांनी बैठक घेतली. यावेळी आज मला शक्‍ती मिळाल्‍याचा अनुभव येत असल्‍याचे सांगून उद्धव ठाकरे म्‍हणाले, आज बहुतेकींच्या डोळयात अश्रू आहेत. गद्दारांच्या डोळ्यात विकृत हसू आहे. यात मी मध्ये उभा आहे. मला यातून मार्ग काढायचा आहे आणि तो मी नक्‍की काढणार. एकच खंत आहे की जे पंचवीस- तीस वर्षे सोबत राहिले ते कट्टर शत्रू झाले. ज्‍यांच्यासोबत इतकी वर्षे लढलो ते काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अजूनही सोबत आहेत. ज्‍यांच्यावर मी पक्षाची धुरा सोपविली होती त्‍यांनीच पाठीत वार केला. हे मला लाजीरवाणे आहे. ज्‍यांच्या भरोश्यावर चाललो होतो त्‍यांनीच दगा दिल्‍याचे उद्धव  ठाकरे म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in