घाटकोपर पंतनगर येथील संरक्षक भिंत कोसळली

या प्रकरणी संबंधित विकासकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे
घाटकोपर पंतनगर येथील संरक्षक भिंत कोसळली
Published on

घाटकोपर पंतनगर येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळली त्यावेळी तेथे कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, इमारत क्रमांक ४३ च्या पुनर्विकासाचे काम सुरू असून खोदकामामुळे हादरे बसल्याने इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

या प्रकरणी संबंधित विकासकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी पोलिसांनी ही इमारत खाली केली असून, या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घाटकोपर पंतनगर येथे म्हाडाच्या इमारती आहेत. या इमारती जुन्या झाल्याने बहुसंख्य इमारती पाडून नव्याने इमारती बांधण्यात येत आहेत. सहकार मार्केट जवळील इमारत क्रमांक ४३च्या पुनर्विकासाचे काम सुरू होते. त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. हे खोदकाम केल्यावर बाजूच्या इमारतीच्या सुरक्षेची काळजी योग्य प्रकारे घेण्यात आलेली नाही. यामुळे इमारत क्रमांक ४२ राजश्री ऑर्चिड या इमारतीच्या खालील माती ढासळून सुरक्षा भिंत आणि वाहने पार्किंगचा काही भाग बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या भागात कोसळला. यावेळी सुरक्षा भिंतीजवळ रहिवासी तसेच वाहने नसल्याने जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in