पावसाने मुंबईला पुन्हा झोडपले, सखल भागात पाणी साचले

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक जाम झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
पावसाने मुंबईला पुन्हा झोडपले, सखल भागात पाणी साचले

गेल्या बुधवारपासून बरसणाऱ्या पावसाची उघडझाप सुरु असून सोमवार सायंकाळपासून पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने मुंबईला पुन्हा एकदा झोडपून काढले. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे बस मार्गात बदल करण्यात आले. तर रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी यलो अॅलर्ट जारी केला आहे.

मुंबईत मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. बुधवारी पावसाने दिवसभर संततधार ठेवल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. मिलन सबवे, अंधेरी सबवे, दादर टीटी, गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, कुर्ला, अंधेरी, वांद्रे, वडाळा आदी सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक जाम झाल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामावर जाणा-या नोकरदारांना कामावार जाण्यास उशिर झाला.

गेल्या काही दिवसांपासून पडणा-या पावसांत अंधेरी सबवे, मिलन सबवे येथे पाणी साचण्याची कायम राहिली आहे. त्यामुळे येथील वाहतुक वळवावी लागली. सलग दोन दिवस पाऊस संततधार कोसळत असल्याने मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागले असले तरी मुंबई ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून दरवर्षीप्रमाणे मुंबईकरांमध्ये फारसा संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर जमा पाण्याचा निचरा झाला आणि रस्ते वाहतूक सुरळीत झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in