'लालबागच्या राजा' ला ३ लाख ६६ हजारांचा दंड

'लालबागच्या राजा' ला ३ लाख ६६ हजारांचा दंड

मंडळाने १८३ खड्डे अनधिकृतपणे पाडल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करताना लालबागच्या राजा मंडळाने पालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. गणेशोत्सवात दर्शनाच्या रांगांसाठी बॅरिकेड्स लावताना रस्त्यावर अनधिकृतपणे खड्डे पाडल्यामुळे पालिकेच्या ‘ई’ वॉर्डने मंडळाला ३ लाख ६६ हजारांचा दंड भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. मंडळाने १८३ खड्डे अनधिकृतपणे पाडल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. ‘ई’ विभागाच्या हद्दीमधील टी.बी. कदम मार्गावर (दत्ताराम लाड मार्ग जंक्शन ते नेकजात मराठा बिल्डिंगपर्यंत) पालिकेची कोणतीही परवानगी न घेता खड्डे पाडले. बॅरीकेड्स लावण्यासाठी खेड खड्डे पाडण्यात आले. यामध्ये फुटपाथवर ५३ तर रस्त्यावर १५० असे एकूण १८३ खड्डे पाडले आहेत. यामध्ये पालिकेच्या नियमानुसार प्रतिखड्डा २ हजार या प्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये दंड केला आहे. ही रक्कम ‘ई’ वॉर्ड कार्यालयात तातडीने भरण्याचे निर्देशही सहायक आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत महेश वेंगुर्लेकर यांनी ‘ई’ विभागाकडे २०२२ च्या गणेशोत्सवात लालबागचा राजा मंडळाने अनधिकृपणे पाडलेल्या खड्ड्यांची स्थिती आणि दंडाची माहिती अधिकारात मागितली होती, याला पालिकेने उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in