भारतीय शेअर बाजारातील तेजी थांबली,सेन्सेक्स घसरला

दोलायमान स्थितीत ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १५०.४८ अंक किंवा ०.२८ टक्का घसरुन ५३,०२६.९७ वर बंद झाला
भारतीय शेअर बाजारातील तेजी थांबली,सेन्सेक्स घसरला

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा सुरु असल्याने बुधवारी चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील तेजी थांबली गेली. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. एकूण ३० पैकी २० कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.

दोलायमान स्थितीत ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १५०.४८ अंक किंवा ०.२८ टक्का घसरुन ५३,०२६.९७ वर बंद झाला. दिवसभरात तो ५६४.७७ अंकांनी घसरुन ५२,६१२.६८ ही किमान पातळी गाठली होती. गुरुवारी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटची समाप्ती असल्याने बाजारात नकारात्मक वातावरण होते, असे सांगण्यात येते. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५१.१० अंक किंवा ०.३२ टकका घटून १५,७९९.१० वर बंद झाला. एनएसईतील ३४ कंप्यांच्या समभागात घसरणझाली.

सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सीस बँक, बजाज फिनसर्व, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टायटन, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरण झाली. तथापि, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने बाजारात मोठी घसरण होऊ शकली नाही.

आशियाई बाजारात टोकियो, शांघायमध्ये घसरण तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती. अमेरिकन बाजारातही मंगळवारी घसरण झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.३१ टक्का वधारुन प्रति बॅरलचा भाव ११८.३ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारत १२४४ .४४ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in