लोकलमध्ये महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक

मध्य-हार्बरवर २०२३ मध्ये विनयभंगाची ४४ गुन्हे नोंदवले त्यातील ४३ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला. २०२२ मध्ये ४५ पैकी ४३ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला. २०२४ च्या जानेवारी-फेब्रुवारीत ११ गुन्हे नोंदवले गेले.
लोकलमध्ये महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक

मेघा कुचिक/मुंबई : मुंबईची लोकल ट्रेन ही वाहतुकीचे मोठे साधन आहे. लाखो प्रवासी त्यातून प्रवास करतात. यात महिलांची संख्या मोठी आहे. या प्रवासात महिलांचे विनयभंग व अत्याचाराचे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढलेले दिसत आहे. प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को अंतर्गतचे गुन्हे नोंदवले जात आहेत.

प. रेल्वेवर २०२३ मध्ये ३१ विनयभंगाची प्रकरणे नोंदवली गेली. त्यातील ३० प्रकरणांचा तपास पोलिसांनी केला. २०२२ मध्ये ४२ प्रकरणे घडली त्यातील ३८ प्रकरणांचा तपास पोलिसांनी केला. २०२३ मध्ये एकही बलात्काराचा गुन्हा नोंदवला नाही तर २०२२ मध्ये दोन बलात्काराचे गुन्हे नोंदवले. तर जानेवारी, फेब्रुवारी २०२४ ची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही.

मध्य-हार्बरवर २०२३ मध्ये विनयभंगाची ४४ गुन्हे नोंदवले त्यातील ४३ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला. २०२२ मध्ये ४५ पैकी ४३ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला. २०२४ च्या जानेवारी-फेब्रुवारीत ११ गुन्हे नोंदवले गेले. त्यातील ७ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला. २०२३ मध्ये दोन बलात्काराचे गुन्हे नोंदवले त्यातील दोन्हींचा तपास पूर्ण झाला.

मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन म्हणाले की, रेल्वे प्रशासन व पोलीसांनी आपले काम पूर्ण क्षमतेने करत नाहीत. रेल्वे राजकीय पोलीस व रेल्वे सुरक्षा बल असतात. मात्र, ते रेल्वे स्थानकावर बसलेले असतात. गुन्हा घडल्यानंतर ते घटनास्थळी येतात. रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र त्याचे फुटेज कुर्ला व ठाण्यात तपासले जाते. अन्य स्थानकांचे काय? अन्य स्थानकात सीसीटीव्हींचे फुटेज तपासले का जात नाही? वाढत्या लोकसंख्येला दोन सुरक्षारक्षक किंवा पोलीस कॉन्स्टेबल पुरेसे नाहीत. मनुष्यबळाची कमतरता व यंत्रणेची योग्यरीतीने न केलेली अंमलबजावणी ही मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले.

गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकल ट्रेन गर्दीने भरून वाहत असतात. याच वेळेस महिलांवर अत्याचार होण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे गर्दी असल्याने कोणालाही न कळता त्याला कार्यभाग साधता येतो.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सचिव लता अरगडे म्हणाल्या की, मनुष्यबळाअभावी आरपीएफ व राजकीय रेल्वे पोलीस प्रत्येक रेल्वे स्थानकावर तैनात करत नाहीत. नागरिक, प्रशासन व अधिकाऱ्यांमध्ये निष्काळजीपणा आहे. महिला नेत्यांचेही याकडे लक्ष नाही, अशी टीका त्यांनी केली.

लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. सरकारी अधिकारी, तपास यंत्रणा, नागरी संस्था व जनतेने एकत्रित काम करणे गरजेचे आहे. वाढीव मनुष्यबळ, चांगली टेहळणी यंत्रणा, मजबूत कायदा आदींची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in