धारावी पुनर्विकासाला गती

धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जगातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी धारावी एक असून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे.
धारावी पुनर्विकासाला गती

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. सोमवारपासून धारावीतील कमला रमण नगर येथून सकाळी १०.३० वाजता डोअर टू डोअर सर्वेक्षण करण्यास सुरुवात होणार असून, दुकानांचाही सर्व्हे होणार असल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले.

धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जगातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी धारावी एक असून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. राज्य सरकार व अदाणी समूह यांचा संयुक्त उपक्रम राबवण्यात येत आहे. धारावी पुनर्विकासाला गती देण्यासाठी १८ मार्चपासून धारावीतील घरांचे सर्वेक्षण करत रहिवाशांकडून घरांची माहिती गोळा करण्यात आली. तर आता सोमवारपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असून धारावीतील दुकानांचाही सर्व्हे होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in