वन विभागाची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर; रस्त्यांवर थर्मो प्लास्टिक पेंटिंगसाठी पालिकेवर पाच कोटींच्या खर्चाचा बोजा

मुंबईत झालेल्या जी-२० परिषदेसाठी उपस्थित प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफेला भेट देणार होते. १६ डिसेंबर २०२२ रोजी ही नियोजित भेट झाली. वनविभाग व पालिकेचे अधिकारी त्यास हजर होते.
वन विभागाची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर; रस्त्यांवर थर्मो प्लास्टिक पेंटिंगसाठी पालिकेवर पाच कोटींच्या खर्चाचा बोजा

मुंबई : वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातंर्गत असलेल्या कामाची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. ताम्हणी पाडा प्रवेशद्वार ते कान्हेरी गुंफापर्यंतचा रस्ता, लाँगहंट ते कान्हेरी चौकीपर्यंतचा रस्ता आणि राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार ते कान्हेरी गुंफा रस्त्यांवर थर्मो प्लास्टिक पेंटिंग या कामासाठी पालिकेने ५ कोटी रुपये खर्च केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत झालेल्या जी-२० परिषदेसाठी उपस्थित प्रतिनिधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफेला भेट देणार होते. १६ डिसेंबर २०२२ रोजी ही नियोजित भेट झाली. वनविभाग व पालिकेचे अधिकारी त्यास हजर होते. या बैठकीत राष्ट्रीय उद्यानातील अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वार तसेच येथील रस्त्यांची दुरूस्ती आणि रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्प कालावधीत रस्ते दुरुस्ती व सुधारणेचे काम करणे शक्य नसल्याचे तसेच यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीचा वन विभागाकडे अभाव असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा पालिकेने करावी, अशी विनंती वनरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी पत्र पाठवून पालिकेला केली होती.

राष्ट्रीय उद्यानाच्या भेटीनिमित्त लेफ्टनंट कर्नल उदय सिंह यांनी पालिकेच्या परिमंडळ सातचे उपायुक्त यांच्यासमवेत केलेल्या पाहणीमध्ये उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कान्हेरी गुंफा आणि कान्हेरी गुंफा ते लाँग हंट पर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोरिवलीतील गोराई गावात रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून कान्हेरी गुंफा परिसरातील रस्त्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

विनानिविदा काम

कंत्राटदाराला गोराईतील कामांसाठी विविध करांसह सुमारे १११ कोटींचे कंत्राट दिले होते. त्यात आणखी ५.१६ कोटी वाढवून देऊन राष्ट्रीय उद्यानातील काम करून घेण्यात आले आहे. त्यामुळे हे एकूण कंत्राट ११६ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. अत्यंत तातडीचे म्हणून निविदा न काढता हे काम देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in