दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न गेले काही दिवस पालकांना व विद्यार्थिंना पडत होता. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्टिटर वरून निकाला बाबतची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दिनांक १७ जुन २०२२ रोजी दु १.०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.पालकांना व विद्यार्थिंना संकेतस्थळावरुन निकाल पाहाता येणार आहे.
महाराष्ट्रातील पुणे,नागपूर,लातूर,मुंबई,औरंगाबाद,कोल्हापूर,नाशिक,अमरावती या नऊ विभागीय शिक्षण मंडळातर्फे नोंदणी केलेल्या विद्यार्थंना त्यांनी संपादित केलेले गुण पुढील वेबसाईटवर दिसणार आहेत .तसेच ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती,पुर्नमुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येईल. या बाबतची सविस्तर माहिती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
त्याचबरोबर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व्टिटरवर व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये परिक्षा घेण्यात आल्या होत्या. आपल्या सर्वांना माहित आहे आपण गेले दोन वर्ष कोरोनाशी लढत आहोत. अशावेळीच परिक्षा घेण्यात आल्या खूप मेहनतीने,कष्टाने,जिद्दीने धैर्याने आपण अभ्यास पूर्ण केला आणि परिक्षेला सामोरे गेलात.सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती की निकाल कधी लागणार तर तो उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. तुम्ही दिलेल्या संकेतस्थळांवर निकाल पाहु शकता. तुम्ही केलेल्या मेहनतीला यश मिळणार आहे. आज सर्व पालकांना व विद्यार्थिंना मी शुभेच्छा देते. उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय व उत्साहाचा जावो असे त्या म्हणाल्या.