उद्या सादर होणार देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकेचा 'अर्थसंकल्प'; महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी योजना

महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी विविध योजना, संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी विशेष तरतूद, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव तरतूद, नव्याने येणाऱ्या नगरसेवकांसाठी राखीव निधी अशा कोट्यवधी रुपयांच्या तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.
उद्या सादर होणार देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकेचा 'अर्थसंकल्प'; महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी योजना

मुंबई : महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी विविध योजना, संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी विशेष तरतूद, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव तरतूद, नव्याने येणाऱ्या नगरसेवकांसाठी राखीव निधी अशा कोट्यवधी रुपयांच्या तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा सन २०२४ - २५ अर्थसंकल्प उद्या शुक्रवारी मांडण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ नसल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेचा सन २०२४ - २५ चा अर्थसंकल्प उद्या शुक्रवारी मांडण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात विशेष म्हणजे महिलांवरील वाढत्या अत्याचार प्रतिबंध उपाययोजना, महिला सक्षमीकरण, सबलीकरण यादृष्टीने महिलांना प्रशिक्षण देणे, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालये अशा विविध तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात खास करुन महिलांसाठी करण्यात येणार आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात 'या' गोष्टीचा समावेश!

  • अग्निशमन सेवेची दर्जोन्नती करणे

  • गलिच्छ वस्ती सुधारणा आणि त्याची दर्जोन्नतीबाबत ठोस उपाययोजना करणे

  • जुन्या उद्यानांचा विकास करणे, विकसित उद्यानांची दर्जोन्नती करणे / त्यांची जोपासना करणे, नव्याने

  • विकसित झालेल्या प्रभागात उद्याने उभारणे

  • शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता, दर्जामध्ये सुधारणा

  • भूमिगत मार्केट, कोळीवाड्याचा विकास

अग्निशमन दल सक्षम करणार!

आपत्कालीन परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाची महत्वाची भूमिका असते आणि ती भूमिका अडीच हजार जवान जीवाची बाजी लावत बजावतात. अग्निशमन दलात मनुष्यबळ वाढवण्यात येत असून लवकरच ९१० जवान तैनात करण्यात येणार आहे.

३९ वर्षांनी प्रशासक सादर करणार अर्थसंकल्प!

मुंबई महापालिकेत १९८४ साली प्रशासक राज्य होते. त्यानंतर तब्बल ३८ वर्षांनंतर मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. मुंबई महापालिकेत ७ मार्च २०२२ रोजी निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्याने ८ मार्चपासून प्रशासकाच्या हाती कारभार आहे. त्यानंतरच्या काळात आतापर्यंत पालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे २०२४-२५ चा अर्थसंकल्प तब्बल ३९ वर्षांनी प्रशासकाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. सन २०२४-२५ चे अर्थसंकल्पीय अंदाज शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात दुपारी १२ वाजता अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. तर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू महानगरपालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाज प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांना सादर करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in