कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीएचा धोका वाढला, राज्यात १४१ रुग्णांची नोंद

पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार, राज्यात बीए. ५ चे ५२ आणि बीए. ४ चे १० रुग्ण आढळले आहेत
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीएचा धोका वाढला, राज्यात १४१ रुग्णांची नोंद

कोरोनाला उतरती कळा लागली असतानाच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ व बीए २.७५ व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. रविवारी, राज्यात बीए ४ व बीए ५ चे ६२ व बीए २.७५ व्हेरिएंटचे तब्बल १४१ बीए व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बीए व्हेरिएंट बळावतोय असून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे.

पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार, राज्यात बीए. ५ चे ५२ आणि बीए. ४ चे १० रुग्ण आढळले आहेत. तर बीए. २.७५ व्हेरीयंटचे देखील ७९ रुग्ण आढळले आहेत.

बीए.२.७५ चे ८ रुग्ण सोलापूर येथील तर उर्वरित सर्व रुग्ण पुणे येथील असून पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए. ४ आणि बीए. ५ रुग्णांची संख्या २५८ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या १९९ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in