गोरेगाव आयटी पार्क परिसरातील रस्ता खचला ; सुरक्षेच्या कारणास्तव एका बाजूची वाहतूक बंद

मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचण्याच्या आणि दरडी कोसळण्याचा घटना घडत आहेत
गोरेगाव आयटी पार्क परिसरातील रस्ता खचला ; सुरक्षेच्या कारणास्तव एका बाजूची वाहतूक बंद

मुंबईससह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. रायगडच्या इर्शाळवाडी येथील मनाला चटका लावणारी घटना ताजी आहे. तसंच मुंबई पुणे महामार्गावर देखील दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही तासांसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या अनेक भागात सद्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. काही ठिकाणी तर गावांचा संपर्क देखील तुटला आहे. अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. तसंच तसंच पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई पावसाळ्यात पाणी तुंबणं किंवा रस्त्यांना खड्डे पडणं ही समस्या जुनीचं आहे. अशात आता अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचा देखील प्रकार घडत आहेत. काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे गोरेगाव आयटी पार्क परिसरात देखील असाच प्रकार समोर आला आहे. गोरेगाव आयटी पार्क परिसरात रस्त्याची एक बाजू खचल्याने त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर या रस्त्याची एका बाजुची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in