समाजवादीची निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका,माविआला दिली सोडचिठ्ठी

आघाडी सत्तेतून पायउतार होण्याआधी हा पक्ष आघाडीसोबत होता
 समाजवादीची  निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका,माविआला दिली सोडचिठ्ठी

महाविकास आघाडीसोबत असलेल्‍या समाजवादी पार्टीनेही आता आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताना शेवटच्या दिवशी औरंगाबाद आणि उस्‍मानाबादच्या नामांतराचा विरोध म्‍हणून समाजवादी पार्टीने हा निर्णय घेतल्‍याचे सपाचे नेते अबू असीम आझमी यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेत समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. समाजवादी पक्षाचे विधानसभेत दोन सदस्य आहेत. आघाडी सत्तेतून पायउतार होण्याआधी हा पक्ष आघाडीसोबत होता. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी पहिल्या दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख हे तटस्थ राहिले. आपण यावेळी तटस्थ भूमिका घेतली याचा खुलासा आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावेळी बोलताना केला. आघाडी सरकार सत्तेवरुन पायउतार होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर केले. मुस्लिम नावे बदलून काय होणार आहे. अशी नावे बदलून तुम्ही काय संदेश देता? त्यापेक्षा त्या शहरांचा विकास करा. नवी शहरे वसवून त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या आम्‍ही त्‍याचे स्‍वागतच करू, असा सल्ला आझमी यांनी दिला

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in