
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असून मंगळवारी तब्बल ४१ पैशांनी घसरुन ७९.३६ ही नवी नीचांकी पातळी गाठली.
विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु ठेवत पैसे काढून घेण्याचा सपाटा सुरु असून वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या दरात झालेली वाढ या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस रुपयाची घसरण सुरु आहे.
इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये मंगळवारी स्थानिक चलन ७९.०४ वर उघडला आणि दिवसभरात तो ७९.०२ ही कमाल आणि ७९.३८ ही किमान पातळी गाठली. दिवसअखेरीस तो ४१ पैशांनी घटून ७९.३६ वर बंद झाला. सोमवारी रुपया ७८.९५ वर बंद झाला होता.