अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला,फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात होणार वाढ

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये स्थानिक चलन ७९.०५ वर उघडला आणि सत्राअखेरीस ७९.१३ वर बंद झाला.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला,फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात होणार वाढ
Published on

रुपयाचे लोटांगण सुरुच आहे. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी घसरुन ७९.१३ झाला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून या महिन्यात व्याजदरात आणखी वाढ होण्याच्या भीतीने डॉलर मजबूत झाला.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये स्थानिक चलन ७९.०५ वर उघडला आणि सत्राअखेरीस ७९.१३ वर बंद झाला. त्यामुळे बुधवारच्या तुलनेत रुपयात १९ पैशांनी घसरण झाली. बुधवारी रुपया ७८.९४ वर बंद झाला होता. रुपया सकाळी फारसा न बदलता उघडला. परंतु रिझर्व्ह बँकेडून बुधवारी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी उपाययोजना जाहीर झाल्यानंतराही रुपयावर दबाव होता, असे गौरंग सोमय्या, फॉरेक्स ॲण्ड बुलियन अॅनालिस्ट, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी म्हटले आहे. भारत ८० टक्के कच्चे तेल विदेशातून खरेदी करतो. त्याचे पेमेंटही डॉलरमध्ये केले जाते आणि डॉलरच्या किमतीमुळे रुपया अधिक महाग होईल. त्यामुळे मालवाहतूक महाग होईल, त्याचा परिणाम होऊन महागाईचा आणखी फटका बसून सर्वच वस्तू महाग होतील.

logo
marathi.freepressjournal.in