डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी घसरला

 डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी घसरला
Published on

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीमा मारा सुरु असल्याने आणि विदेशी बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय चलन बाजारात बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी घसरुन ७७.६० या नव्या नीचांकी पातळीवर गेला.

आंतरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात बुधवारी सकाळी रुपया ७७.५७ या घसरणीने उघडला आणि दिवसभरात तो ७७.६१ या नव्या नीचांकी पातळीवर गेला. दिवसअखेरीस तो ७७.६० या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाच्या दरात १ टक्क्यांवर वाढ झाल्याने रुपया घसरला.

मंगळवारीही दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरुन ७७.४७ वर बंद झाला होता. तत्पूर्वी, मंगळवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.४९ पर्यंत घसरला होता. सकाळी ७७.६७ वर उघडल्यानंतर दिवसभरात तो ७७.७९ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला होता. कच्च्या तेलाचे वाढते दर आणि घाऊक महागाईचा चढता पारा यामुळे सकाळी रुपया घसरल्यानंतर तो सावरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी ९ मे २०२२ रोजी भारतीय चलनात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. जेव्हा ते डॉलरच्या तुलनेत ५२ पैशांनी घसरून ७७.४२ वर गेला. तेव्हापासून, तो आणखी घसरत असून शुक्रवारी ७७.५५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

logo
marathi.freepressjournal.in