डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी मजबुत

दिवसभरात ते ८१.५८ ह्या कमाल आणि ८१.९४ या किमान पातळीवर पोहचले होते
डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी मजबुत

डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी १३ पैसे मजबूत होऊन ८१.८०वर बंद झाला. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर रुपयाला बळ मिळाले. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये स्थानिक चलन ८१.६०वर उघडले. दिवसभरात ते ८१.५८ ह्या कमाल आणि ८१.९४ या किमान पातळीवर पोहचले होते. अखेरीस ते १३ पैशांनी मजबूत होऊन ८१.८०वर बंद झाले.

बुधवारी रुपया प्रथमच डॉलरच्या तुलनेत ८२ च्या खाली घसरला आणि शेवटी ४०पैशांनी घसरून ८१.९३ च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. परदेशातील बाजारपेठेतील अमेरिकन चलन मजबूत झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी जोखीम असलेल्या बाजारात गुंतवणूक करणे टाळल्याने रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. देशांतर्गत इक्विटी बाजारातील सततची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत भांडवल बाहेर पडल्यानेही देशांतर्गत चलनावर दबाव वाढला. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ८१.९०वर उघडला. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत तो १४ पैशांनी मजबूत होऊन ८१.५३वर बंद झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in