काँक्रीटच्या रस्त्यांसाठी घाई; दुसऱ्या टप्यातील २०० रस्त्यांसाठी सहा हजार कोटींची निविदा

दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तीन ते सहा मीटरच्या लहान रस्त्यांचेही काँक्रीटीकरण केले जाणार आहे.
काँक्रीटच्या रस्त्यांसाठी घाई; दुसऱ्या टप्यातील २०० रस्त्यांसाठी सहा हजार कोटींची  निविदा
Published on

मुंबई : सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी पहिल्या टप्प्यातील ९१० पैकी ११ कामे पूर्ण झाली, तर ४ कामे सुरू आहेत. त्यात दुसऱ्या टप्प्यातील २०० सिमेंटच्या रस्त्यांसाठी सहा हजार ३७३ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तीन ते सहा मीटरच्या लहान रस्त्यांचेही काँक्रीटीकरण केले जाणार आहे.

खड्डेमुक्त मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे आदेश -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर ४०० किमीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या आणि जानेवारी २०२३ मध्ये पाच कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली. या कामांपैकी १२३ कामे सुरू झाली असून उर्वरित ७८७ कामांना सुरुवात झालेली नाही. आतापर्यंत ११ कामे पूर्ण झाली आहेत. या कंत्राटात शहरातील दक्षिण मुंबईतील काम मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराला देण्यात आले होते. नियोजित वेळेत काम सुरू करण्यात न आल्याने पालिकेने या कंत्राटदाराला ६४ कोटींचा दंड ठोठावून त्याचे कंत्राट रद्द केले. त्यानंतर शहरातील रस्त्यांसाठी गेल्या आठवड्यात १,३६२ कोटींच्या निविदा मागवली आहे. पहिल्या टप्प्यातील कामे अपूर्ण असताना दुसऱ्या टप्प्यातील निविदा मागवल्याने पालिकेवर टीका होण्याची शक्यता आहे. अटींनुसार, पावसाळा वगळता कामे पूर्ण होण्यास किमान २४ महिने लागतील. नवीन रस्त्यांची काम ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू होणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निविदांची २ फेब्रुवारीपासून ऑनलाईन विक्री सुरू असून २० फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत निविदा विक्री सुरू राहणार असून त्याच दिवशी अवघ्या एक तासात दुपारी १२ वाजेपर्यंत विक्रीची मुदत आहे.

काँक्रीटीकरणाचा खर्च

सन २०२२-२३

शहर १,३६२ कोटी ३४ लाख ६ हजार

पूर्व उपनगर ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार

पश्चिम उपनगर

परिमंडळ : ३ - १२२३ कोटी

८४ लाख ८३ हजार

परिमंडळ : ४ - १६३१ कोटी

१९ लाख १८ हजार

परिमंडळ : ७ - ११४५ कोटी

१८ लाख ९२ हजार

रस्त्यांची किलोमीटर कामे

शहर विभाग ९७ किमी

पूर्व उपनगर ७० किमी

पश्चिम उपनगर २५३.६५ किमी

सन २०२४-२५

शहर : १३६२ कोटी ४ लाख

पूर्व उपनगर ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार

पश्चिम उपनगर

परिमंडळ ३ : वांद्रे पूर्व आणि पश्चिम, अंधेरी पूर्व ८६४ कोटी २७ लाख

परिमंडळ ४ : अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड १५६६ कोटी ६५ लाख

परिमंडळ ७ : कांदिवली, बोरिवली, दहिसर १४०० कोटी ७३ हजारर

पूर्व उपनगर

१२२४ कोटी ३९ लाख

पूर्व उपनगर - ३ कोटी ६७ लाख १७ हजार

logo
marathi.freepressjournal.in