मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांची सुरक्षा वाऱ्यावर

मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांची सुरक्षा वाऱ्यावर

मार्केट्समध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे काळाची गरज झाली आहे; मात्र मुंबई महापालिकेच्या ९२पैकी फक्त १० मार्केट्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज झाली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरीच्या घटनांना लगाम बसला आहे. त्यामुळे आजच्या घडीला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य झाले आहे. मुंबई महापालिकेची २४ वॉर्डात ९२ मार्केट्स असून १७,१६४ गाळेधारक आहेत. मुंबई महापालिकेच्या मार्केट्समध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कागदावरच दिसून येतात. तसेच मार्केट्स इतरत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे मार्केट्समध्ये येणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात मार्केट मध्ये विशेष करून महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना नसून सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे गृहिणीचे म्हणणे आहे. मुंबईतील अनेक मार्केटचे नूतनीकरण होत असून सुरक्षारक्षक ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.

मार्केटची स्थिती

एकूण मार्केट्स : ९२

गाळेधारक : १७,१६४

सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले : १० मार्केट्स

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in