बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू

शरीरात रक्ताची कमतरता असल्यामुळे त्याला सायन हॉस्पीटलमध्ये नेले होते
बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू

मुंबई : कफ परेड पोलिसांकडे एका इसमाच्या अपमृत्यूची नोंद झाली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील फूटपाथवर आजारी अवस्थेत पडलेल्या जब्बार नावाच्या इसमाला ग्रेस फाऊंडेशनच्या मेलकॉम कॉलिन्स यांनी कफ परेड पोलिसांची परवानगी घेऊन आपल्या फाउंडेशनमध्ये ठेवून घेतले. त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला पालिकेच्या रुग्णालयात नेले. त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यामुळे त्याला सायन हॉस्पीटलमध्ये नेले असता, जब्बारला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळेच पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला असून सदर इसमाच्या नातेवाईकांनी ९६७३१८६८७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in