शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग चौथ्या दिवशीही घसरला

शेअर्सची सतत होणारी विक्री व कच्च्या तेलाच्या दरात होणारी वाढ याचा बाजारावर मोठा परिणाम
शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग चौथ्या दिवशीही घसरला
Published on

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग चौथ्या दिवशी घसरला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.५० टक्के वाढ केल्यानंतर सेन्सेक्स २१४.८५ अंकांनी घसरला. परकीय वित्तसंस्थांकडून शेअर्सची सतत होणारी विक्री व कच्च्या तेलाच्या दरात होणारी वाढ याचा मोठा परिणाम बाजारावर झाला आहे.

शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१४.८५ अंकांनी घसरून ५४८९२.४९ वर बंद झाला. दिवसभरात तो ५५,४२३.९७ वर गेला तर ५४,६८३.३० पर्यंत घसरला. निफ्टी ६०.१० अंकांनी घसरून १६३५६.२५ वर बंद झाला आहे. रेपो दरात वाढ केल्याने गृह, वाहन व अन्य कर्ज महाग होणार आहेत. गेल्या पाच आठवड्यात व्याजदर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. बुधवारच्या दिवसात भारती-एअरटेल, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंटस‌्, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आदींचे समभाग घसरले. टाटा स्टील, एसबीआय, डॉ. रेड्डी, बजाज फायनान्स, टीसीएस आणि टायटन आदींचे समभाग वधारले. पतधोरणात किरकोळ महागाई दर ५.७ वरून ६.७ टक्के अंदाजित करण्यात आला. आता तो वास्तविक परिस्थितीवर आला आहे. यामुळे आरबीआयच्या धोरणाची विश्वासर्हता व आत्मविश्वास वाढला आहे, असे सॅमको सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख येशा शहा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in