दोलायमान स्थितीनंतर सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स घसरला

बीएसई सेन्सेक्स १५२.१८ अंक किंवा ०.२९ टक्का घसरुन ५२,५४१.३९ वर बंद झाला.
दोलायमान स्थितीनंतर सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स घसरला

जागतिक बाजारातील संमिश्र वातावरण आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सुरु असलेला सपाटा लक्षात घेता दोलायमान स्थितीनंतर सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स १५२ अंकांनी घसरला.

दि ३० बीएसई सेन्सेक्स १५२.१८ अंक किंवा ०.२९ टक्का घसरुन ५२,५४१.३९ वर बंद झाला. दिवसभरात तो २००.२१ अंक किंवा ०.३७ टक्का घटून ५२,४९३.३६ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ३९.९५ अंक किंवा ०.२५ टक्का घटून १५,६९२.१५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत एनटीपीसी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, टेक महिंद्रा आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात घसरण झाली. तर बजाज फिनसर्व, टाटा स्टील आणि लार्सन ॲण्ड टुब्रो यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये घसरणतर शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूडमध्ये घसरण होऊन प्रति बॅरलचा भाव १२० अमेरिकन डॉलर झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी ४,५०२.२५ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in