शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी गडगडला

शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी गडगडला
Published on

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी गडगडला. जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केली. यामुळे सेन्सेक्स ३०३.३५ अंकांनी घसरला. तर निफ्टी ९९.३५ अंकांनी घसरून १६०२५ वर बंद झाला आहे.

परदेशी वित्तसंस्थांकडून सतत सुरू असलेला विक्रीचा मारा व तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे बाजारावर दबाव कायम आहे. एशियन पेंटस‌्, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, लार्सन ॲड टुब्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, एसबीआय आदी कंपन्यांचे समभाग घसरले. तर एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आदी कंपन्यांचे समभाग वधारले.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कठोर उपाययोजना करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मंदीची दाट शक्यता आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार हे सतर्क आहे. फेडरल रिझर्व्हच्या मिनीटस‌्मध्ये काय म्हटले आहे, याची वाट जागतिक बाजार करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे संरक्षणात्मक मूडमध्ये आहेत. तर व्हॅल्यू स्टॉक्स व सेक्टरला मागणी आहे. दिवसभरात २६११ समभाग घसरले तर ७१७ वधारले तर ११६ समभागांच्या किंमती स्थिर राहिल्या. हँगकँग, शांघाय, सेऊल, टोकियो आदी शेअर बाजार वधारले.

कच्चे तेलाचे दर १.३७ टक्के वधारून ११५.१ डॉलर्सवर पोहचले. तर रुपया ३ पैशांनी वधारून ७७.५४ वर बंद झाला. परदेशी वित्तसंस्था सतत विक्रीचा मारा करत आहेत. मंगळवारी २३९३.४५ कोटींचे समभाग विक्री केली.

logo
marathi.freepressjournal.in