विधानभवनात शिंदे गटाला मिळाले सातव्या मजल्‍यावर स्‍वतंत्र कार्यालय

शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय विधानभवनाच्या चौथ्‍या मजल्‍यावर आहे.
 विधानभवनात शिंदे गटाला मिळाले सातव्या मजल्‍यावर स्‍वतंत्र कार्यालय

राज्‍यात सत्‍तांतर झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. सत्‍तांतर झाले असले तरी शिंदे गटाने आम्‍हीच शिवसेना असा दावा कायम ठेवला आहे. आता विधानभवनात देखील शिंदे गटाला सातव्या मजल्‍यावर स्‍वतंत्र कार्यालय मिळाले आहे. शिवसेनेचे आधीचे चौथ्‍या मजल्‍यावरील कार्यालय कायम आहे.

शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय विधानभवनाच्या चौथ्‍या मजल्‍यावर आहे. शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्‍तावाच्या वेळी विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. त्‍यावेळी शिंदे गटाला विधिमंडळ पक्ष कार्यालय मिळाले नव्हते. चौथ्‍या मजल्‍यावरील शिवसेनेच्या कार्यालयाला त्‍यावेळी कुलुप लावण्यात आले होते; मात्र आता शिंदे गटाला विधानभवनाच्या सातव्या मजल्‍यावर कार्यालय देण्यात आले आहे. त्‍यामुळे आता चौथ्‍या मजल्‍यावर शिवसेनेचे तर सातव्या मजल्‍यावर शिंदे गटाचे कार्यालय राहणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in