अभियंत्यांची उणीव दूर होणार; विविध विभागातील ६६४ पदे भरणार

रस्ते, पूल, मलनिःसारण, पर्जन्य जलवाहिनी अशा विविध विभागांत चोख जबाबदारी पार पाडण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते.
अभियंत्यांची उणीव दूर होणार; विविध विभागातील ६६४ पदे भरणार

मुंबई : रस्ते, पूल, मलनिःसारण, पर्जन्य जलवाहिनी अशा विविध विभागांत चोख जबाबदारी पार पाडण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे विविध विभागांतील अभियंत्यांची ६६४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याचे सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. महापालिकेतील ६६४ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून शासनाच्या मान्यतेनंतर आता लवकरच याची जाहिरात प्रकाशित केली जाईल आणि त्यातील अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाणार आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/वास्तुशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. याबाबतच्या भरतीला प्रशासकांची मान्यता मिळाल्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस संस्थेची नेमणूक यापूर्वीच करण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, सिव्हील-२३६ पदे, कनिष्ठ अभियंता, एम अँड ई-११६ पदे, दुय्यम अभियंता सिव्हील-२३३ पदे, दुय्यम अभियंता, एम अँड ई- ७७ पदे व वास्तुविशारद ९ पदे अशाप्रकारे एकूण पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात आरक्षण तसेच बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या पडताळची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याची जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे.अभियंत्यांची उणीव दूर होणार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in