'द स्ट्रोक्स ऑफ रिदम' हे चित्रप्रदर्शनाला जहांगीर आर्ट गॅलरीत सुरुवात

२० नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येणार आहे.
'द स्ट्रोक्स ऑफ रिदम' हे चित्रप्रदर्शनाला जहांगीर आर्ट गॅलरीत सुरुवात

आपला भारत देश हा ऐतिहासिक वारसा आणि परंपरासाठी ओळखला जातो. उदात्त अशी सामाजिक सभ्यता भारतात दिसून येते. अनेक जाती जमातीचे लोक,त्यांच्या चालीरीती, भाषा, पंथ, रूढी, पोशाख, जीवनशैली जरी विविध असल्या तरी येथे सलोख्याने, सुसंवादाने नांदतात. याच संस्कृतीचे दर्शन घडवणारे "द स्ट्रोक्स ऑफ रिदम" या चित्रप्रदर्शनाला मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येणार आहे.

सर्वसाधारणपणे भारतातील नृत्य प्रकारांचे शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य अशा दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. स्थानिक परंपरा व तेथिल भौगोलिक वातावरण, पोशाख, राहणी, लोकांचा समूह यातून ती ती नृत्यशैली दिसते. लोकनृत्य हे ऋतूच्या आगमनाच्या वेळी, लग्नसमारंभात, सणाच्या वेळी आनंद व्यक्त करण्यासाठी सादर केले जाते. शास्त्रीय नृत्याबद्दल भरतमुनिंच्या नाट्यशास्त्रामध्ये विस्तृतपणे वर्णन आढळते. भारतीय शास्त्रीय नृत्याचा उद्देश हा भक्ति आणि आराधना आहे. शास्त्रीय नृत्याची उत्पत्ती ही मंदिरातूनच झाली. 'स्ट्रोक्स ऑफ रिदम ’ याद्वारे,कलेचा शिष्य या नात्याने मी माझ्या चित्रांतून शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य तसेच भटक्या जमाती यामधून समृध्द अशा भारतीय संकृतीचे आणि परंपरेचे होणारे दर्शन, चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामधे कलाकाराने नृत्य कला आणि वास्तुकला या दोहोचे मिश्रण साकारण्याचाही प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in