वरळीतील अभ्यास गल्लीला मिळणार नवी झळाळी

वरळीतील पोदार रुग्णालयाजवळील एस. के. अहिरे रोडवर ही अभ्यास गल्ली आहे.
वरळीतील अभ्यास गल्लीला मिळणार नवी झळाळी

आकर्षक विद्युत रोषणाई, भिंतींवर रंगीबेरंगी पेंटिंग, जीवनात बदल घडवणारे दिशा मॅप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, वारसा लाभलेल्या वरळीतील अभ्यास गल्लीला नवी झळाळी मिळणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका ७० लाख रुपये खर्च केले आहेत.

मुंबईकरांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणाऱ्या मुंबई महापालिकेने आता तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून उद्यानात मोफत वाचनालय, सायकल ट्रॅक अशा सुविधा उपलब्ध करत आहे. आता वरळीतील पोदार रुग्णालयाजवळील एस. के. अहिरे रोडवर ही अभ्यास गल्ली आहे. या ठिकाणी विविध प्रकारची झाडेही आहेत. रहदारीपासून काहीसा दूर असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास, वाचन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी अभ्यास केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनीयरिंग, पोलीस अशा विविध क्षेत्रात आपले करीअर घडवले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणाची पडझड झाली होती. याची दखल घेत पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणाची डागडुजी, सौंदर्यीकरण, सुशोभिकरण करण्यात आल्याची माहिती जी/दक्षिणचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in