कॅण्टीनच्या नावाने चहा विक्रेत्याला गंडा

विश्‍वास संपादन करून त्याने त्याच्याकडे त्याच्या कागदपत्रांची मागणी केली
कॅण्टीनच्या नावाने चहा विक्रेत्याला गंडा

मुंबई : कॅण्टीनच्या नावाने एका चहा विक्रेत्याला गंडा घालून पळून गेलेल्या दोघांना साकिनाका पोलिसांनी अटक केली. मोरेश्‍वर वामन मोडक ऊर्फ संजय ऊर्फ आकाश आणि कमलेश वामन मोडक अशी या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत महेश साळवी याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. अरविंद रामभरोसे मुखिया हा तरुण कुर्ला येथे राहत असून, त्याचा साकिनाका, सुंदरबाग परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय आहे.

पाच महिन्यांपूर्वी त्याची मोरेश्‍वर या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने त्याच्या चहाची कौतुक करुन त्याने त्याला फिल्मसिटीमध्ये चहाची कॅण्टीन सुरू करण्यास मदत करुन त्याला दरमाह तीस हजार रुपये वेतन देतो असे सांगितले. त्याचा विश्‍वास संपादन करून त्याने त्याच्याकडे त्याच्या कागदपत्रांची मागणी केली होती. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत या कामासाठी त्याला ३ लाख ८८ हजार रुपये दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in