अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर ठाकरे गटाचा बहिष्कार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सागरी सेतूच्या कामाला गती मिळाली.
अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर ठाकरे गटाचा बहिष्कार

प्रतिनिधी/मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागल्याचे राजकीय पडसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवरही पडले आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्धाटन झालेल्या अटलसेतूच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाव नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला.

मुंबई-नवी मुंबईला अवघ्या २० मिनिटांत जोडणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नवी मुंबईतील विविध कार्यक्रमाचे देखील यावेळी लोकापर्ण करण्यात आले. सरकारच्या स्थानिक कार्यक्रमात आमदार, खासदारांची नावे असणे आवश्यक असते. परंतु, शिवसेनेच्या (ठाकरे) खासदार, आमदार आणि विरोधी पक्ष नेत्यांची नावे या निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आली. जाणीवपूर्वक विरोधकांच्या लोकप्रतिनिधींना डावलले, असा आरोप ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींनी करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या सागरी सेतूच्या कामाला गती मिळाली. या सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटल सेतू असे नाव दिले. मार्गाचे काम पुर्ण झाले असताना, पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम करण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने उद्घाटन लांबवले असा आरोप, ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला.अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर ठाकरे गटाचा बहिष्कार

logo
marathi.freepressjournal.in