लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या साडेदहा लाखांची चोरी

घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना ही माहिती दिली होती.
लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या साडेदहा लाखांची चोरी

मुंबई : घरात घुसून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. लक्ष्मीपूजनासाठी घरातील देव्हाऱ्यात ठेवलेले दागिने आणि रोकड चोरी झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. चोरीचा गुन्हा नोंदवून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पळून गेलेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सोमवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास बोरिवलीतील मेन कस्तुरबा रोड, कार्टर रोड क्रमांक तीनच्या जागृती एसआरए इमारतीमध्ये ही घटना घडली. तक्रारदाराने रविवारी लक्ष्मीपूजनानिमित्त देव्हाऱ्यात एका स्टिलच्या ताटात विविध सोन्याचे दागिने आणि ३५ हजाराची कॅश असे सुमारे साडेदहा लाख रुपये ठेवले होते. मात्र सकाळी उठल्यानंतर कुणीतरी हा मुद्देमाल पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in