गिरगाव चौपाटीवर रंगणार १५० नौकांचा थरार; मुंबईकरांना अनुभवता येणार ‘सेल इंडिया २०२५’चा रोमांच

येत्या २१ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान गिरगाव चौपाटीवर सेल इंडिया २०२५ कार्यक्रमाचा रोमांचकारी अनुभव मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.
गिरगाव चौपाटीवर रंगणार १५० नौकांचा थरार; मुंबईकरांना अनुभवता येणार ‘सेल इंडिया २०२५’चा रोमांच
एक्स @airnewsalerts
Published on

मुंबई : येत्या २१ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान गिरगाव चौपाटीवर सेल इंडिया २०२५ कार्यक्रमाचा रोमांचकारी अनुभव मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील उच्च दर्जाचे खलाशी आणि स्पर्धक सहभागी होऊन प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करतात. हा वार्षिक सेलिंग कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात गिरगाव चौपाटीवर आर्मी यॉटिंग नोड, मुंबई येथे आयोजित केला जातो.

सेल इंडियाचा हा कार्यक्रम मुंबईतील एकमेवाद्वितीय असून यामुळे शहराला नौकाविहार खेळाचे प्रमुख ठिकाण म्हणून दर्शवतो. चौपाटी आणि मरीन ड्राइव्हवर हजारो प्रेक्षकांना आकर्षित करतो. एक खेळ म्हणून नौकाविहार करण्यासाठी केवळ शारीरिक सहनशक्तीच नाही तर मानसिक कणखरता देखील आवश्यक असते आणि या स्पर्धेत स्पर्धकांना आव्हान स्वीकारण्याची संधी मिळते.

एसबीआय सेल इंडिया २०२५ ही या वर्षीची सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप असणार आहे. २१ ते २६ जानेवारी २५ दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) च्या नेतृत्वाखाली आयोजित केली जात आहे. या शर्यती मरीन ड्राइव्हच्या खाडी परिसरात आणि राजभवनाबाहेर आयोजित केल्या जाणार आहेत.

असे आहे नियोजन

या वर्षीच्या कार्यक्रमात आयएलसीए ७, आयएलसीए ६, ४९ईआर, एनएसीआरए १७, आयक्यू फॉइल, फॉर्म्युला काईट, ४७० यासह अनेक श्रेणी तील नौका असतील; ज्यामध्ये १२० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. खलाशी त्यांच्या बोटी तयार करत आहेत आणि त्यांच्या रणनीतींमध्ये सुधारणा करत आहेत. ही शर्यत २२ जानेवारी २०२५ रोजी सुरू होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in