मुंबईतील मार्केटचा कायापालट स्वच्छतेची यंत्रणा, अत्याधुनिक टॉयलेट आदी सुविधा दिवाळीनंतर बदल दिसणार, पालकमंत्री केसरकर यांची माहिती

हाजीअलीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी रोज हजारो पर्यटक येत असतात. अशी ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून नावारुपाला यावीत यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत
मुंबईतील मार्केटचा कायापालट स्वच्छतेची यंत्रणा, अत्याधुनिक टॉयलेट आदी सुविधा दिवाळीनंतर बदल दिसणार, पालकमंत्री केसरकर यांची माहिती
Published on

मुंबई : अस्वच्छता दुरवस्था अशी स्थिती आता मुंबईतील मार्केट मध्ये यापुढे दिसणार नाही. मुंबईतील मार्केट मध्ये अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत मुंबईतील मार्केट नवीन लूक मध्ये दिसतील, असा विश्वास मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दादरचे फुल मार्केट, आगर बाजार, सीटी लाईट, आदी मार्केट रोज गजबजलेली असतात. अशा मार्केटच्या ठिकाणी आवश्यक सुविधा नाहीत. शौचालयाची सुविधा नसल्याने अनेकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. मार्केट स्वच्छ व सुविधांयुक्त ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसाठी अत्याधुनिक मशिनरी, टॉयलेट व व इतर सुविधा निर्माण करून मार्केटचा चेहरा, मोहरा बदलला जाणार आहे, असे पालकमंत्री केसरकर य़ांनी सांगितले. दादरचा फूल मार्केट, आगर बाजार आदी मार्केटना भेटी देऊन तेथील आढावा घेतल्याचे केसरकर म्हणाले. दिवाळीनंतर मार्केटमध्ये हळू हळू बदल दिसेल. विशेषतः अत्याधुनिक टॉयलेटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही खासगी कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. त्यामुळे सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

हाजीअली येथे अत्याधुनिक टॉयलेट

हाजीअलीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी रोज हजारो पर्यटक येत असतात. अशी ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून नावारुपाला यावीत यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. हाजीअली ठिकाणी अत्याधुनिक टॉय़लेटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विचार सुरु असून लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in