शिवाजी पार्कातील बाळासाहेबांनी लावलेले झाड उन्मळून पडल

झाडाचे मूळ अजून मजबूत असल्याने स्मृतिस्थळाच्या काही अंतरावर झाडाचे प्रत्यारोप करू, असे महापौरांनी सांगितले
शिवाजी पार्कातील बाळासाहेबांनी लावलेले झाड उन्मळून पडल

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी २५ वर्षांपूर्वी शिवाजी पार्क मैदानात गुलमोहराचे झाड लावले होते. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाजवळ असलेले झाड रविवारी रात्री उन्मळून पडले. झाड कोसळल्याने स्मृतिस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच झाडाचे मूळ अजून मजबूत असल्याने स्मृतिस्थळाच्या काही अंतरावर झाडाचे प्रत्यारोप करू, असे महापौरांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे नाते सर्वांनाच परिचित आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या येथे अनेक सभा गाजल्या आहेत. पार्काच्या मैदानावरती बाळासाहेबांनी स्वतः एक गुलमोहराचे झाड लावले होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर याच झाडाच्या जवळ त्यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आले होते. मागील अनेक वर्षापासून उभे असलेले हे झाड रविवारी रात्री उशिरा कोसळले. कोसळलेल्या या झाडाजवळच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे काही प्रमाणात नुकसान झाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in