घाटकोपर येथे रॉबरीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

आरोपींविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड
घाटकोपर येथे रॉबरीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक
Published on

मुंबई: घाटकोपर येथे रॉबरीसाठी आलेल्या एका त्रिकुटाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. मिलिंद भिमराव तायडे, राजू भादईराम जयस्वाल आणि सलीम सुल्तान शेख अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री घाटकोपर पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. घाटकोपर येथील एनएसएस रोड, युनियन बँकेजवळील महिंद्रा पार्कसमोर गस्त घालताना पोलिसांना काही तरुण संशयास्पद फिरताना दिसून आले. त्यामुळे या तरुणांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना लोखंडी रॉड, ब्लेड आणि स्क्रू ड्राव्हर सापडले. चौकशीत ते तिघेही रॉबरीच्या उद्देशाने आले होते. तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यांनतर तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. यातील मिलिंद आणि सलीमविरुद्ध घाटकोपर, पंतनगर, कुर्ला, पार्कसाईट, सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्यात रॉबरीच्या उद्देशाने लैगिंक अत्याचार, अनैसगिक लैगिक अत्याचार करणे, घरफोडी, रॉबरीचे अनुक्रमे नऊ आणि आठ गुन्हे दाखल आहेत तर सलीमविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात एका जबरी चोरीची नोंद होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर या तिघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in