लोकल ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालून स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल ; कारवाईची मागणी

रिकामा डबा असतानाही हा तरुण जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.
लोकल ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालून स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल ; कारवाईची मागणी

मुंबई लोकलमध्ये लोकं नेहमीचं आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. गर्दीच्या वेळी नागरिक रोज लोकलमध्ये सफर करतात. एका रिकाम्या लोकलमध्ये एक तरुण धोकादायक असा स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत आहे.

कुर्ला ते मानखुर्द (हार्बरलाईन) या मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरुण धोकादायक स्टंट करताना दिसून येत आहे. धावत्या लोकलमध्ये हा तरुण लोकलच्या पायऱ्यांवर स्टंट करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत हा तरुण लोकलच्या पायऱ्यांवर उभा राहून प्रवास करत आहे. या व्हिडिओत असं ही समजतं आहे की हा डब्बा त्यावेळी रिकामा होता. रिकामा डबा असतानाही हा तरुण जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.

दरम्यान, या ठिकाणी जर हा डबा रिकामा नसता तर नागरिकांनी नक्कीच या तरुणाला हे करण्यापासून अडवले असते. जसवंत सिंग या व्यक्तीने या तरुणाचा व्हिडिओ काढून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या व्हिडिओला पाहून आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि मुंबई डिव्हिजन यांनी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं उत्तर दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in