वॉण्टेड आरोपीस झारखंड येथून खंडणीविरोधी पथकाने केली अटक

गेल्या आठवड्यात एका आमदाराला मंत्रिपदाची ऑफर देत या टोळीने त्यांच्याकडून १०० कोटींची मागणी केली होती
वॉण्टेड आरोपीस झारखंड येथून खंडणीविरोधी पथकाने केली अटक

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एका आमदाराकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस झारखंड येथून खंडणीविरोधी पथकाने अटक केली. नंदकिशोर प्रसाद, असे या ५९ वर्षीय आरोपीचे नाव असून, तोच या कटातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

यापूर्वी याच गुन्ह्यात रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी आणि सागर विकास संगवई या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवड्यात एका आमदाराला मंत्रिपदाची ऑफर देत या टोळीने त्यांच्याकडून १०० कोटींची मागणी केली होती. चर्चेअंती त्यांच्यात ९० कोटी रुपयांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यापैकी २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी आणि उर्वरित रक्कम शपथ घेतल्यानंतर देण्याचे ठरले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने या आमदाराच्या खासगी सचिवाने पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती घेताना १८ कोटी रुपये घेण्यासाठी आलेल्या रियाजसह योगेश, जाफर आणि सागर या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत ते एन. के. सिंग या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in