खलबत्याने ठेचून पत्नीने केली पतीची हत्या

शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे.
खलबत्याने ठेचून पत्नीने केली पतीची हत्या
Published on

भाईंदर : मिरारोड मधील एका इमारतीत राहणाऱ्या पती-पत्नी यांच्या भांडणात पत्नीने आपल्या पतीची खलबत्याने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. रमेशकुमार गुप्ता असे मृतकाचे तर राजकुमारी गुप्ता असे आरोपी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेशकुमार गुप्ता आमि राजकुमारी गुप्ता हे दाम्पत्य मिरारोडमधील शांतीनगर-२ भागात स्वामी नारायण मंदिरा समोरील आनंद सरिता ए-९ या इमारतीत राहत होते. या दोघांमध्ये नेहमीच या ना त्या कारणाने वाद होत होते. पती-पत्नी यांच्या भांडणात पत्नीने आपल्या पतीची खलबत्याने ठेचून हत्या केली. ही घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. त्याची माहिती मिळताच नया नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, रमेशकुमार गुप्ता हा आजारी होता अशी माहिती मिळत आहे. तर त्याची पत्नी राजकुमारी गुप्ता ही सुद्धा मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या पतीशी झालेल्या भांडणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेची माहिती वॉचमॅन व शेजऱ्यांनी कंट्रोल रूमला फोन करून दिली. त्यावरून पोलिसांनी सदरील घटना स्थळावर जाऊन पाहणी केली. सदरील गुन्ह्याचा अधिक तपास नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे हे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in