पत्नीने केली प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्नीने केली प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

साकिनाका येथे नसीम शेख या २२ वर्षांच्या तरुणाची हत्या करून पळून गेलेल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. रुबीना शेख आणि मोहम्मद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याने रुबीनाने मोहम्मद सैफच्या मदतीने पती नसीम शेख याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पाच वर्षांपूर्वी नसीमचे रुबीनासोबत विवाह झाला होता. नसीम हा त्याच्या वडिलांसोबत टेलरिंगचे काम करीत होता. लग्नानंतर ते दोघेही पवईतील आयआयटी परिसरात राहत होते. गेल्या सहा दिवसांपासून ते दोघेही साकिनाका येथील सरवर चाळीत राहण्यासाठी आले होते. या दोघांमध्ये सतत क्षुल्लक कारणावरून भांडण होत होती. नसीम हा रुबीनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोन दिवसांपासून नसीमच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यात सोमवारी त्याच्या राहत्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती साकिनाका पोलिसांना दिली होती. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना नसीमचा कुजलेल्या अवस्थेत बेडमध्ये मृतदेह सापडला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in