सात लाख घेऊन पत्नी प्रियकरासोबत पळाली

विक्रोळी पोलीस ठाण्यात मंजौतकौरची मिसिंग तक्रार केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता.
सात लाख घेऊन पत्नी प्रियकरासोबत पळाली

मुंबई : प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पत्नीनेच व्यावसायिक पतीचे सुमारे सात लाख रुपये घेऊन पलायन केले. याप्रकरणी आरोपी पत्नीसह प्रियकराविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. मंजोतकौर पड्डा आणि साहेबसिंग पवार अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. विक्रोळी परिसरात राहणारे तक्रारदार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, मंजौतकौर ही त्यांची पत्नी आहे. गेल्या आठवड्यात ती घरातून सिलाईचे कपडे घेऊन येते, असे सांगून गेली आणि परत घरी आली नाही. तिचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात मंजौतकौरची मिसिंग तक्रार केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता.

logo
marathi.freepressjournal.in