दिवा स्थानकात झाली महिलेची प्रसूती

दिवा स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी यावेळी तैनात असलेल्या महिला रेल्वे पोलीस कर्मचारी ममता डांगी याना याविषयी माहिती दिली.
 दिवा स्थानकात झाली महिलेची प्रसूती

रेल्वे प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे पोलिसांकडून नेहमीच सहकार्य केले जाते. याची प्रचिती बुधवार ६ जुलै रोजी दिवा स्थानकात आली. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिवा स्थानकात एका गर्भवती महिलेला प्रवासादरम्यान प्रसूती कळा जाणवू लागल्या.

ही बाब लक्षात घेत दिवा स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी यावेळी तैनात असलेल्या महिला रेल्वे पोलीस कर्मचारी ममता डांगी याना याविषयी माहिती दिली. यावेळी ममता यांनी तात्काळ जीआरपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसूती वेदना होत असलेल्या महिला प्रवाशाला सहकार्य करत तिला जवळच्या रुग्णालयात नेले. महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून गोंडस बाळाला जन्म देण्यात आला आहे. महिला रेल्वे पोलिसांच्या सहकार्यामुळे वेळेत उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांकडून महिला रेल्वे पोलीस ममता डांगी यांचे कौतुक करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in