धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोंडस बाळाला जन्म

सध्याच्या धावत्या युगात एकमेकांकडे पाहण्यासही कोणाला वेळ मिळत नाही. परंतु, अजूनही माणुसकी टिकून असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. १२२९३ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीसांनी सहमहिला प्रवाशाची मदत घेत, एका महिला प्रवाशाची सुखरूप प्रसूती केली.
धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोंडस बाळाला जन्म

मुंबई : महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि एलटीटी-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. त्याचवेळी एक्स्प्रेसमध्ये असलेले तिकीट तपासनीस महिलेच्या मदतीला धावून आले आणि सह महिला प्रवाशांच्या मदतीने महिलेची सुखरूप प्रसुती झाली आणि धावत्या एक्स्प्रेसमध्ये या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.

सध्याच्या धावत्या युगात एकमेकांकडे पाहण्यासही कोणाला वेळ मिळत नाही. परंतु, अजूनही माणुसकी टिकून असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. १२२९३ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीसांनी सहमहिला प्रवाशाची मदत घेत, एका महिला प्रवाशाची सुखरूप प्रसूती केली.

नंद बिहारी मीना, आलोक शर्मा, राजकरण यादव, आणि इंद्र कुमार मीना या तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांसह इतर सर्वांना ट्रेनमधील महिलेच्या बाळंतपणाची माहिती मिळताच, तत्काळ संबंधित कारवाई करत दुसऱ्या महिला प्रवाशांची मदत घेतली आणि गर्भवती महिलेची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात मदत केली. त्यांच्या या धाडसी कृतीचे रेल्वेच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, तपासनीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ रेल्वेतील संबंधित यंत्रणेला घटना कळवत ट्रेनला बुरहानपूर येथे आपत्कालीन थांबा देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आई आणि नवजात शिशुला पुढील वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. बुरहानपूर येथील सिटी रुग्णालयामध्ये आई आणि नवजात बाळ दोघेही निरोगी आहेत. हे कुटुंब प्रयागराज येथे आपल्या मूळ गावी जात होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in