
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील १,८०० हून कर्मचारी व २०० सयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेचे काम अहोरात्र सुरू असते. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबई लक्ष केंद्रित केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन सार्वजनिक स्वच्छता कामकाजाची पाहणी केली होती. प्रमुख रस्ते आणि परिसर या ठिकाणी नित्यनेमाने होत असलेल्या स्वच्छतेप्रमाणेच इतर लहान रस्ते, गल्ली, वस्ती तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेची कार्यवाही अधिक चांगल्यारीतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील घनकचरा व्यवस्थापन विभाग, सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालय व सर्व संबंधित खात्यांना कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मनुष्यबळ
पालिका : १ हजार ४२७
बिगर शासकीय संस्था : २४१
कंत्राट तत्त्वावर : ८०
एकूण कर्मचारी : १ हजार ७४८
प्रतिक्रिया
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील १ हजार ७४८ मनुष्यबळ, त्याचप्रमाणे जेसीबी, डंपर आदी मिळून सुमारे १८६ वाहने तैनात केली आहेत. या सर्व मनुष्यबळ आणि सयंत्रांच्या मदतीने लहानसहान रस्ते, गल्ल्या, पदपथ, वस्ती, सार्वजनिक प्रसाधनगृह यांची विशेष स्वच्छता केली जात आहे.
- चंदा जाधव, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)