नगरविकास विभागांच्या कामांना शिंदे सरकार कडून स्थगिती,काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का

महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच मार्च ते जून २०२२ मध्ये हा निधी मंजूर करण्यात आला होता.
 नगरविकास विभागांच्या कामांना शिंदे सरकार कडून स्थगिती,काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९४१ कोटी रुपयांच्या नगरविकास विभागांच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी तब्बल २४५ कोटी रुपयांची कामे ही विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच मार्च ते जून २०२२ मध्ये हा निधी मंजूर करण्यात आला होता. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेल्या निधीलाही स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने यापूर्वीही अशी भूमिका महानगरपालिकेच्या निधीसंदर्भात घेतली होती. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देताना एकनाथ शिंदे सरकारने शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना कोणतीही स्थगिती दिलेली नाही. सत्तांतर झाल्यानंतर शिंदेंकडून मविआ सरकारच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता,असा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते; मात्र विधान भवनातील भाषणात अजित पवारांचे शिंदेंनी खूप कौतुक केले होते. यानंतर मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती दिली असून यातून नाराज गटाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in